सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून राजकीय द्वेषापोटी होत असलेल्या कारवाई व केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन व अजितदादांचे समर्थन करण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने चार हुतात्मा पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी अजित पवार यांच्या समर्थनार्थ व केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हे आंदोलन शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, महेश कोठे, दिलीप कोल्हे मनोहर सपाटे जनार्दन कारमपुरी, शफी इनामदार, जुबेर बागवान, तौफिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे, शहराध्यक्ष सूनिता रोटे, नलिनी चंदेले, लता फुटाणे, इरफान शेख, राजन जाधव, शंकर पाटील, कोंडी सर, वसीम बुरहान, फारूक मटके, जावेद खैरदि, अजित बनसोडे, प्रकाश जाधव, अमिर शेख, तनवीर गुलजार, मिलिंद गोरे, बसू कोळी शिवराज विभुते, निशांत सावळे सोमनाथ शिंदे, महिपती पवार, रुपेश भोसले आशुतोष नाटकर अजित पात्रे अजित बनसोडे गफूर शेख इरफान शेख एजाज शेख सर्फराज शेख नागेश निंबाळकर राजू कुरेशी चंद्रकांत पवार अनिल उकरंडे बाळासाहेब मोरे सागर चव्हाण किशोर चव्हाण आनंद मुस्तारे प्रमोद भोसले शामराव गांगर्डे, श्रेयस जाधव, नागनाथ मेंगाने श्रीनिवास कोंडी ज्योतिबा गुंड विजय भोईटे आशिष जेटीथोर तसेच महिला पदाधिकारी लता ढेरे, वंदना भिसे, अश्विनी भोसले, मनीषा माने, युवती पदाधिकारी शौर्या पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संतोष पवार म्हणाले, अजितदादा महाराष्ट्रची शान आहे, आमची ताकद आहे, आमचे दैवत आहेत, त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे, आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही म्हणून ही केवळ राजकिय द्वेषापोटी केलेली कारवाई आहे.
महेश कोठे म्हणाले, भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, महागाई वाढली, गॅस वाढला, पेट्रोल दर आभाळाला गेले, त्यामुळे संपूर्ण देशात विरोध होत चालला आहे, त्यांचा बालेकिल्ला असलेला उत्तर प्रदेशात जनता संतापली आहे आणि त्यामुळे द्वेषातून अजित पवार यांच्या कुटुंबीयांवर सूडबुद्धीने छापे टाकण्यात आले आहेत मात्र राष्ट्रवादी ते खपून घेणार नाही या शब्दात त्यांनी निषेध नोंदवला.
तौफिक शेख म्हणाले, ही कारवाई राजकीय द्वेषापोटी आणि सूडबुद्धीने केलेली आहे, केंद्राच्या आयकर विभागाने ही कारवाई त्वरित थांबवावी अन्यथा सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल.
विद्या लोलगे म्हणाल्या, अजितदादा या चौकशीतून सुखरूप बाहेर येतील असा विश्वास संपूर्ण महाराष्ट्रला आहे, छाप्यामधून ही त्यांना काय मिळाले नाही, अजित पवार हे राजकारणात आहेत मात्र त्यांच्या निष्पाप बहिणींनी काय केलंय, ही वृत्ती भाजपच्या विचारसरणीला शोभणारी नाही.


















