सोलापूर येथील अक्कलकोट रोड मुद्रासन सिटीच्या प्रवेशद्वारासमोरच्या मुख्य चेंबरमध्ये नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू होते यामध्ये बेचैन ऋषिदेव. आशिष कुमार राजपूत. मगना आहार सुनील गुलजारीलाल ढाका विशाल जिवाजी हिप्परकर. मेहबूब शेख .हरीशंकर बुरी लाल हे काम करत होते
जुनी ड्रेनेज लाईन नवीन ड्रेनेज जोड जोडण्याचे काम करत असताना विषारी वायू बाहेर पडला त्यामुळे गुदमरून चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला आणि दोन जण जखमी होते आहे या प्रसंगातील जखमी असलेले मेहबूब शेख यांना पाहण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांनी यशोधरा हॉस्पिटलला भेट दिली.
जखमींची विचारपूस करून वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मेहबूब शेख यांच्या कुटुंबाचा सांत्वन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारणी सदस्य अंजना गायकवाड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजरत्न फडतरे विक्रांत गायकवाड सुजाता वाघमारे पल्लवी सुरवसे हेमा वाघमारे दर्शना गायकवाड विनोद इंगळे बबन अनिरुद्ध वाघमारे राज कांबळे किरण साळवे गौतम बनसोडे बबन शिंदे अभिजीत गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याठिकाणी अंजलीताई आंबेडकर यांनी संबंधित ठेकेदारावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रशासनाकडे करून, वंचित बहुजन आघाडी मृत झालेल्या कुटुंबाला न्याय देण्याचे काम करेल अशी ग्वाही दिली.

















