प्रेरणा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, सोलापूरच्यावतीने गरजू व अभ्यासू विदयार्थ्यांना 35 सायकल व 3 महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या संचालिका प्रमिला उबाळे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भंन्ते सारीपुञ, चिञकार सचिन खरात, शारदा गजभिये, चंद्रिका चौहान, संतोष कोथळीकर, गणेश सूञावे, सुगतरत्न गायकवाड , मंयक चौहान, आदि मान्यवर उपस्थित होते.
भंन्ते सारीपूञ यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देत विदयार्थ्यांनी दिलेल्या वस्तूचा योग्य वापर केला पाहिजे, दिलेल्या वस्तूची जाणीव ठेवून पुढे चालले पाहिजे असे आवाहन केले. सचिन खरात यांनी मदतीचे आश्वासन देत उपक्रमास शुभेच्छा, मुलाना स्टुडिओ भेटीचे आमंञण दिले. चंद्रिका चौहान यांनी संस्थेच्या उपक्रमाचे व नियोजनाचे भरभरून कौतुक करत कायम सहकार्य करण्याचे आवाहन दिले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रज्ञा ननवरे या विदयार्थिनीच्या स्वागत गीताने झाली, त्यानंतर आलेल्या पाहुणाची ओळख व स्वागत झाले. पाहुण्यांना संस्थेचे लोगो चिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
प्रमिला उबाळे यांनी संस्थेच्या वाटचालीचा लेखाजोखा व या उपक्रमाविषयी थोडक्यात विचार मांडले. महत्वाचे म्हणजे देणगीदार जर्मनीची त्यांची मैञिण सॅबरिना व तिचे कुटुंब, व तेथील टिकटाॅक ग्रुप( जर्मनी) व उरलिक हिलगर यांचे त्यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्हारी देणे यांनी केले. प्रमिला उबाळे यांनी आलेल्या सर्व पाहूण्याचे सहृदय आभार व धन्यवाद मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, माने सर, शेख मॅडम, श्रृती सांळूके, विठ्ठल बारडोळे, आदित्य, साई, मयूरी, सोहन सरवदे, पियुष ननवरे, समृध्दि, सुकेशनी ननवरे व भीमराव उबाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.