सोलापूर : शहरातील व्हीआयपी रोडवरील मोची या शोरूम चालकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या राज्याच्या प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे या आक्रमक झाल्या असून त्यांनी मोची समाजातील युवकांसह त्या शोरूम समोर निदर्शने केली.
सात रस्ता परिसरातील व्हीआयपी रोडवर मोची या नावाचे कपडे तसेच शूज आणि चपलाचे शोरूम आहे. त्या शोरूम मधील चप्पल आणि बुटांवर मोची हे नाव छापले आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील मोची समाज आक्रमक झाला असून ज्योती वाघमारे यांनी याप्रकरणी या शोरूम समोर आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन चपलांवर मोची हे नाव छापून समस्त मोची समाजाचा अपमान करणाऱ्या मोची मेट्रो ब्रँडचे चेअरमन रफिक मलिक यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.