सोलापूर : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. तसेच आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते तिरंगी फुगे हवेत सोडून “हात से हात जोडो अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी माजी विश्वनाथ चाकोते, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, शिवलिंग कांबळे, तौफिक हत्तुरे, विनोद भोसले, फिरदोस पटेल, अनुराधा काटकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आज प्रजासत्ताक दिन जनतेसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा दिवस, प्रजासत्ताक दिवस साजरा करत असताना सध्याच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा, विरोधकांचा आवाज दाबला जातोय, संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण केला जात आहे. मा. राहूलजी गांधी यांनी “भारत जोडो” यात्रेच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहर, जिल्ह्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक वार्डात, प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी “हात से हात जोडो” अभियान काँग्रेस पक्षाने सुरू केले असून त्याच्या माध्यमातून महागाई, बेरोजगारी, भ्रष्ट्राचार, भारत जोडो यात्रेचा संदेश, राहुलजी गांधी यांचा संदेश असलेला पत्र, केंद्रातील मोदी आणि महाराष्ट्रातील खोके सरकारचे जनता शेतकरी विरोधी धोरणे आणि अपयशी कारभार तळागाळातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवुन माणसे जोडण्याची जबाबदारी आपली असून प्रत्येक घरापर्यंत हे अभियान पोहोचवा असे आवाहन केले.
यावेळी चेतन नरोटे यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती दिली की, १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले, परंतु आपल्याकडे कोणतेही सरकार किंवा राज्यघटना किंवा राजकीय पक्ष नव्हते. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने राज्यघटना लागू केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील सर्व नागरिकांना त्यांच्या धर्म, संस्कृती, जात, लिंग आणि पंथ यांच्याशी संबंधित समान अधिकार मिळावेत अशा पद्धतीने त्याची निर्मिती करण्यात केली. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो.
यावेळी किसन मेकाले, अँड मनीष गडदे, अलका राठोड, आरिफ शेख, सुशीला आबूटे, उदय चाकोते, गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे, अंबादास गुत्तीकोंडा, अंबादास करगुळे, अँड केशव इंगळे, नागनाथ कदम अशोक कलशेट्टी, NK क्षीरसागर, सुनील रसाळे, दत्तू बंदपट्टे, हनमंतु सायबोलू, महेश लोंढे, हाजिमलंग नदाफ, राजन कामत, तिरुपती परकीपंडला, सुभाष चव्हाण, जाबिर अल्लोळी, मैनुद्दीन शेख, शौकत पठाण,अनिल मस्के, डॉ. अप्पासाहेब बगले, मोहन अंत्रोळीकर, वैभव पाटील, जुबेर कुरेशी, इलियास शेख, कुणाल घोड़के, प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, शुभम माने, कय्यूम बलोलखान, शकील मौलवी, याकूब मंगलगिरी, शोहेब महागामी, भीमाशंकर जमादार, चक्रपाणी गज्जम, मोहसिन बागवान, सैफन शेख, लतीफ शेख, रुस्तम कंपली, मल्लीनाथ सोलापुरे, समीर काझी, सोमनाथ व्हटकर, विश्वराज चाकोते, पुरुषोत्तम श्रीग़ादी, भोजराज पवार, रफीक चकोले, संजय गायकवाड़, लखन गायकवाड, गजेंद्र खरात, हसीब नदाफ, रियाज नाईकवाड़ी, AD चिनिवार, राजाभाऊ महाडिक, वसिष्ठ सोनकांबले, विजय शाबादी, जितु वाडेकर, राहुल वर्धा, महेश काळे, महेंद्र शिंदे, विकास येळेगावकार, महमूद शेख, कांतिलाल धोत्रे, नागनाथ शावने, हारून शेख, मधुकर आठवले, नूर अहमद नालवार, शरद गुमटे, राजेश झंपले, सुनील सारंगी, दीपक मठ, नासिर खान, दत्तात्रय लोकरे, उपेंद्र ठाकर, चंद्रकांत टिक्के, शशिकांत जाधव, रजाक कादरी, श्रीशैल रानखंबे, शकील शेख, पंडित गणेशकर, पृथ्वीराज नरोटे, रहमान शेख, अंजली मंगोडेकर, शोभा बोबे, प्रमिला तुपलवंडे, सुमन जाधव, अरुणा बेंजरपे, पारुबाई काळे, जकिया पठाण, अनिता भालेराव, मीणा गायकवाड, मुमताज तांबोळी, नीता बनसोडे, लता गुंडला, स्नेहल शिंदे, श्रद्धा आबूटे, पूजा नेल्लूरवार, रुकैयाबानु बिराजदार, रेणुका मंजुळकर, करीमुनिस्सा बागवान, अरुणा वर्मा, संघमित्रा चौधरी, ताहिरा रायचुरकर, चंदा काळे, चेतमल गोयल, संतोषी गुंडे, सिद्राम सलवदे, शोहेब कडेचुर, बापु घुले, लता सोनकांबळे, प्राजक्ता घाटे, सुनीता शेरख़ाने, रेखा बिनेकर, जब्बार शेख, मशाक मुल्ला, सादिक शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केले.