शिवसेना जिल्हाप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते पुरुषोत्तम बर्डे यांचा वाढदिवस दिनांक ०२ मे रोजी आहे. आजपासून 3 मे पर्यंत ते परगावी जात असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, विनोद भोसले, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, N.K. क्षीरसागर, देवा गायकवाड, उदयशंकर चाकोते, अरुण साठे, अंबादास गुत्तिकोंडा, अंबादास करगुळे, भिमाशंकर टेकाळे, वाहिद बिजापुरे, नागनाथ कदम, राजन कामत, तिरुपती परकीपंडला, अनिल मस्के, संजय गायकवाड, युवराज जाधव, VD गायकवाड़, दिनानाथ शेळके, प्रकाश गेंटयाल, पृथ्वीराज नरोटे, सुभाष वाघमारे, सुमन जाधव, शरद गुमटे, शिवशंकर अंजनाळकर, सुरेश राठोड, वसिष्ठ सोनकांबळे, नूर अहमद नालवार, विवेक इंगळे, राजेंद्र शिरकुल, शोहेब महागामी, समीर काझी, रशिद शेख, दाऊद नदाफ, सुनील सारंगी, नागनाथ शावने, मनोहर चकोलेकर, श्रीकांत दासरी, मल्लीनाथ सोलापुरे, शाहु सलगर, मल्लू म्हेत्रे, सन्नी देवकते, सिद्धू बिराजदार, संकेत माने, गणेश वड्डेपल्ली, अनिल हलकट्टी यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना बरडे यांनी आपल्या भाषणात शहराध्यक्ष नरोटे यांचे तोंड भरून कौतुक केले त्यासह येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा तब्बल पावणे दोन लाखाच्या फरकाने विजय होईल असा दावा करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खुश केले. बरडे नक्की काय म्हणाले पहा हा व्हिडिओ…


















