सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके रजेवर जाऊ नये अशी माझी कायम भूमिका होती, फडके यांचे वागणे योग्य नव्हते, त्यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती चा दिलेला अर्ज चुकीचा व अर्धवट आहे. त्यामुळे राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याशी माझी चर्चा झाली आहे.
मांढरे यांना प्रस्ताव पाठवणार असून त्यांची स्वेच्छा सेवानिवृत्ती अर्ज स्वीकारून आम्हाला दुसरा अधिकारी द्या अशी मागणी करणार आहे. असे सांगतानाच चार्ज द्यायचा कुणाला ही जबाबदारी माझी आहे, मी लवकरच चार्ज उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे किंवा शिक्षणाधिकारी नाळे यांच्याकडे देणार आहे असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान पत्रकारांनी माध्यमिक चा चार्ज देताना दोन उपशिक्षणाधिकाऱ्यांचा विषय येतो आपल्याकडे पूर्ण वेळ योजना शिक्षणाधिकारी असताना त्यांचे नाव का येत नाही असा प्रश्न केला असता आवक जावक रजिस्टर गहाळ प्रकरण गंभीर असून त्या शिक्षणाधिकार्यावर लवकरच एफ आर आय होण्याची शक्यता आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली. पहा त्या काय म्हणाल्या…..