मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा, त्यातून झालेली टीका हे सगळं पचवून राज्यातल्या सत्ताधारी भाजपने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये इतर पक्षांना आस्मान दाखवलंय. राज्याच्या ग्रामीण भागातील ओबीसी आणि मराठा समाजाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला साथ देत ७०० हून अधिक ग्रामपंचायतींचं दान भाजपच्या पदरात टाकलंय. आतापर्यंत हाती आलेल्या ग्रामपंचायत निकालांपैकी 427 ग्रामपंचायती म्हणजे 33 टक्के यश एकट्या भाजपला मिळालंय.
राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मनोज जरांगे – पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या उपोषणानंतर राज्यात मोठं आंदोलन उभं राहिलं. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर मनोज जरांगे – पाटील यांनी भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, या टीकेचे धनी होऊन देखील ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या संख्येनं मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी असल्याचं निवडणूक निकालांमधून स्पष्ट होतंय. त्याचबरोबर राज्यातल्या ओबीसी समाजाने देखील देवेंद्र फडणवीसांना पूर्वीपासून दिलेली साथ अजूनही सोडलेली नाही. उलट ओबीसी आणि मराठ्यांनीच भाजपचा हा मोठा विजय साकार केल्याचं विश्लेषण राजकीय विश्लेषकांनी केलंय. यामुळे राज्याचं खरं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच असल्याच्या विचाराला आता पुन्हा बळकटी मिळताना दिसतेय.
ग्रामपंचायत निवडणूक निकालांच्या दुपारी 3.30 वाजता आलेल्या निकालांनुसार विजयी घोषित झालेल्यांमध्ये भाजप ७१७ राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) ४०७, शिवसेना (शिंदे गट) २६२, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) १८५, कॉंग्रेस २०७, शिवसेना (ठाकरे गट) ११४, आणि इतर 60 आहेत.
आंदोलनातील टीकेचा परिणाम नाही
मराठा आरक्षण आंदोलन काळात टीका होऊनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे – पाटील यांचं उपोषण मागे घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जरांगे – पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणाऱ्यांमध्ये 4 मंत्र्यांसह 2 माजी न्यायमूर्तींना पाठवण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या माजी न्यायमूर्तींंनीची जरांगेंना आरक्षण मिळवण्यासाठी लागणारा वेळ व त्यामागची कायदेशीर गुंतागुंत समजवून सांगितली. हे जाणून घेतल्यावर जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचा संदेश जनतेत गेला. हे सगळं होत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचा पुनरुच्चारही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या सगळ्याचा परिपाक म्हणूनच अतिशय भरघोस यश भाजपच्या पारड्यात पडल्याचं राजकीय जाणकारांना वाटतंय. निवडणूक निकालांमधून हे सिद्ध होत असून निकाल येण्यासाठी शिल्लक राहिलेल्या इतर ग्रामपंचायतींच्या निकालांमध्येही भाजपने आघाडी घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात भाजपाची संपूर्ण देशात यशस्वी घौडदौड सुरू आहे.
‘पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा आहे.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत 750 हून अधिक जागा जिंकत भाजपाने राज्यात क्रमांक एकचे स्थान पटकाविले आहे.
राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीला सुद्धा हा राज्यातील जनतेने दिलेला सुस्पष्ट कौल आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा मोठे यश या निवडणुकीत मिळाले. राज्यातील महायुतीने एकत्रितरित्या 1400 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय संपादन केला आहे.
राज्यातील जनतेवर त्यांच्या सरकारच्या काळात अतोनात सूड उगविणार्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बेरीज केली तरी त्याच्या दुप्पट यश एकट्या भाजपाला मिळाले आहे. महाराष्ट्रातील जनतेने आपला कौल दिला आणि तोही सुस्पष्ट दिला, त्यांचे खूप खूप आभार !
या विजयासाठी अहोरात्र परिश्रम करणार्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. सतत प्रवास करणारे आणि कार्यकर्त्यांना प्रेरित करणारे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही अभिनंदन ! ठिकठिकाणचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांचेही अभिनंदन. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांचेही मी हार्दिक अभिनंदन करतो.
नवनिर्वाचितांचे अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
https://x.com/dev_fadnavis/status/1721513671158088145?s=46&t=S0m9fgIBggcpst3bZGqn1g