सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे या गावी 2021 साली झालेल्या मुसळधार पावसामुळे गावच्या ओढ्याला पूर आला होता यामुळे गावचा संपर्कही तुटला होता.
त्याचवेळी गावातील शेतकरी बाबासाहेब नवनाथ माने यांचे दोन बैल या पुराच्या पाण्यात वाहून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून माने हे शासकीय मदत मिळण्यासाठी दक्षिण तहसील कार्यालयात फेऱ्या मारत होते.
शेवटी मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या हस्ते माने यांना पन्नास हजार रुपयांचा शासकीय मदतीचा चेक देण्यात आला.
दरम्यान यासाठी गावचे सरपंच विश्रांत गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे बाबासाहेब माने यांनी सांगताना तहसीलदार जमदाडे यांचेही आभार मानले.