महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सोलापूर मधील अधिकृत गुणलेखक व पंच असलेले मिलिंद गोरे यांनी नुकतीच देशात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पुणे येथे पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध नेदरलँड या सामन्यात गुनलेखक (स्कोरर) म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली असून अशी संधी – सन्मान मिळणारे ते पहिलेच सोलापूरकर ठरले असून त्यांच्या या यशाबद्दल शहर आणि जिल्ह्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आयसीसी कडून होत असलेल्या वर्ल्ड कप मधल्या काही सामन्यांचे आयोजन बीसीसीआय यांच्या वतीने एमसीए कडून पुण्यात होत असून ८ नोव्हेंबर रोजी पुणे येथील एमसीए च्याच आंतरराष्ट्रीय स्टेडियम वर वर्ल्ड कप मधला ४० वा सामना इंग्लंड व नेदरलँड या दोन संघादरम्यान पार पडला आणि या सामन्यात एकूण 4 पैकी एक गुणलेखक अर्थात स्कोरर म्हणून मिलिंद गोरे यांना मीडिया साठी एमसीए कडून संधी/कामगिरी देण्यात आली होती व ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली असल्याचे त्यांनी सांगितले.
एमसीए अध्यक्ष आमदार रोहित पवार, सचिव – खजिनदार – COO तसेच इतर सर्व अपेक्स काऊन्सिल मेंबर यांच्या सहकार्याने त्यांना ही संधी मिळाली असून याचवर्षी जून मध्ये पुण्यात पार पडलेल्या MPL स्पर्धेत (२००९-१०-११ मध्ये) देखील त्यांनी स्कोरर म्हणून भूमिका निभावली होती.
मिलिंद गोरे हे उच्च विद्याविभूषित (एम.ई.) त्यांनी २००७ पासून क्रिकेट मधल्या स्कोरिंग या वेगळ्या क्षेत्रात त्यांनी इंजिनियर असून पण एक वेगळे करियर म्हणून पाहत पंच म्हणून सुरूवात केली. २००८ मध्ये पंच परीक्षा दिली व सोबतच स्कोरिंग ला सुरूवात केली. आधुनिक तंत्रज्ञाना च्या साहाय्याने तसेच सुंदर हस्ताक्षर ही जमेची बाजू सांभाळत अगदी कमी वेळात त्यांनी स्कोरिंग मध्ये हातखंडा मिळवत एमसीए चेच माध्यमातून पुण्यात बीसीसीआय च्या आंतरराज्य १० सामन्यात अधिकृत गुणलेखक म्हणून काम केले ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्याच आंतर जिल्हा अनेक सामन्यात, तसेच रणजी निवड, इतर राज्य देश दौऱ्यातील व विद्यापीठ सामन्यात उत्तमरित्या manual तसेच linear/peogressive स्कोरिंग केल्यामुळे.
डिजिटल स्कोरिंग तसेच क्रिकेट मधील सांख्यिकी माहिती क्षणात मिळवून देण्यात देखील ते निष्णात असून मुंबई येथील ACSSI चे माध्यमातून घेण्यात आलेल्या गुणलेखन परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण असून त्यांच्याकडील मोबाईल, लॅपटॉप स्कोरिंग तंत्रज्ञानामुळे त्यांनी आत्तापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यात तेथील जिल्हा संघटनेच्या अधिकृत क्रिकेट स्पर्धेत, देशातील इतर राज्यातील अनेक स्पर्धेत पंच व गुणलेखनाची कामगिरी बजावली असून २०१५ मध्ये एमसीए ने घेतलेल्या पंच लेखी परीक्षेत देखील उत्तीर्ण झाले होते.
तसेच मिलिंद गोरे हे राज्यातील पहिलेच अशी व्यक्ती ठरले आहेत ज्यांनी सोलापूरात सगळ्यात आधी मोबाईल स्कोरिंग आणि टीव्ही पंच प्रणाली सुरू केली असून राज्यात त्याचा वापर विविध स्पर्धेत केला जात आहे. आईवडिलांचे आशीर्वाद, कुटुंब आणि मित्रांचे सहकार्य पाठबळ यामुळे हे यश लाभल्याचे व भविष्यात देखील अनेक सामन्यात अशी कामगिरी करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.