सोलापूर : सम्राट मौर्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन सलगर यांना वाढदिवसाच्या दिवशीच तेलंगणातील बीआरएस पक्षाकडून विधानसभा निवडणुक लढविण्याची ऑफर आली. होळकर यांचा वंशज विधानसभेत गेलाच पाहिजे असा निर्धार यावेळी करण्यात आला. सलगर यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवी पेठेतील लक्ष्मी संकुल या ठिकाणी नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे, बीआरएस नेते यशपाल भिंगे, महात्मा फुले सुत मिलचे चेअरमन अभिजीत ढोबळे, गोल्डन मॅन अक्षय अर्जुन, युवा उद्योजक एस के जहागीरदार, व्हीआयपी फाउंडेशनचे विजय चोळळे, कोमल शर्मा, मल्लिकार्जुन पुजारी यांच्यासह सत्कार करण्यासाठी विविध स्तरावरील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीआरएस नेते यशपाल भिंगे यांनी आपल्या भाषणात पक्ष महाराष्ट्रातील 288 जागा लढवणार असल्याचे सांगत अर्जुन सलगर यांनी कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शवावी तो मतदार संघ त्यांच्यासाठी आम्ही देऊ. जनतेमध्ये आणि सर्वसामान्यांना येऊन जाणारे अशा नेतृत्वाला निश्चितच विधानसभेमध्ये पाहायला आवडेल अशी भूमिका भिंगे यांनी व्यक्त केली.
मनीष काळजे यांनी सलगर यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख केला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभा करणार हा नेता असल्याचा उल्लेख करत वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या.

















