विकृत भाजपची सुसंस्कृत पिढी गेली कुठे ? सोलापुरात प्रणिती शिंदेंचा सवाल, आडम मास्तर गरजले ! “मला कुणी विकत घेऊ शकत नाही”
सोलापूर : महाविकास आघाडीच्या वतीने कॉंगेस पक्षाचे आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदार संघामधून निवडणूक लढवीत आहेत. त्यांना घटक पक्षाच्यावतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सक्रीय जाहीर पाठींबा दिलेला असून त्यांच्या विजयाची जय्यत तयारी चालू आहे. मात्र विघ्नसंतोषी धर्मांध भाजपाकडून खोटे व अनाठायी आरोप करत लाल बावटयाकडे बोट दाखवत आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना घेऊन अविरतपणे रस्त्यावरची लढाई करणारा लाल बावटा हा कधीच कोणत्याही प्रलोभनांना, आश्वासनांना बळी पडणारा विकावू नाही तर जनतेच्या हितासाठी रक्त सांडणारा हा लाल बावटा लढाऊ आहे असे म्हणत मार्क्सवादावर अढळ निष्ठा जोपासणाऱ्या पक्षनिष्ठ कार्यकर्ता कॉ. आडम मास्तरांना कोणीही विकत घेऊ शकत नाही. अशी सिंहगर्जना कुंभारी येथील भव्य जाहीर सभेत ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केली.
बुधवार दि. १ मे २०२४ रोजी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ४२ (अ.जा) सोलापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठनेते कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा पार पडली.
उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सध्या विकृत झालेली भाजपची सुसंस्कृत पिढी गेली कुठे असा सवाल करत त्या म्हणाल्या सध्या देशात धर्मांध वातावरण आणि राष्ट्रीय एकात्मतेला नख लावण्याचे काम चालू आहे. विकासाच्या मुद्द्यांना केराची टोपली देऊन खोटी आश्वासने देत आहेत. १० वर्षात लोकांना रोजगार, अन्नसुरक्षा, महागाई, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नाही. या उलट देशाची संपत्ती लुटणाऱ्या आणि कर बुडवणाऱ्या बड्या भांडवलदारांची कर्ज माफी सरकारने केली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप मुक्त, भ्रष्टाचारमुक्त भारत घडविण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी मला प्रचंड मताने विजयी करा. कारण मी जनतेच्या प्रश्नांना घेऊन युध्दाला निघालेली आहे. माझे मनोबल व आत्मबल वाढविण्यासाठी प्रत्येकाचे मत बहुमोलाचे आहे. हा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माकपाचे जिल्हा सेक्रेटरी एम.एच. शेख, माजी महापौर महेश कोठे, कामगार नेते विष्णू कारमपुरी आदींनी सभेला संबोधित केले.
यावेळी माजी नगरसेविका कामिनी आडम, माकपा राज्यकमिटी सदस्य नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, सुनंदा बल्ला, फातिमा बेग, शकुंतला पाणीभाते, कॉंग्रेस चे जिल्हा अध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, बिपीन करजाळे, कॉ. गोदुताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व सचिव, कॉ. विल्यम ससाणे, कॉ. वसीम मुल्ला आदींची उपस्थिती होती.
जाहीर सभेचे प्रास्ताविक कॉ. युसुफ शेख (मेजर) यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अॅड. अनिल वासम यांनी केले.
जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी बापू साबळे, मुन्ना कलबुर्गी, हसन शेख, अप्पाशा चांगले, वसीम देशमुख, रफिक काझी, गोविंद सज्जन, बालाजी तुम्मा, राजू गेंटयाल, कुर्मेश म्हेत्रे, योगेश अकिम, नरेश गुल्लापल्ली, चंटी बिटला, कादर शेख, मधुकर चिल्लाळ, अफसाना बेग, नागनाथ जल्ला, सुरेश गुजरे, दशरथ आमटी, देवपुत्र सायाबोळू, दिनेश बडगु, प्रभाकर गेंटयाल, शफी शेख, जैद मुल्ला, मोहसीन शेख, सद्दाम बागवान, नागनाथ म्हेत्रे, राहुल बुगले, राकेश म्हेत्रे, नवनीत अंकम आदींनी परिश्रम घेतले.