पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात मराठीत काय काय बोलले ; मोदी कुठे पाहून मराठी बोलतात
Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. यापूर्वी 2019 मध्ये आल्यानंतर त्यांनी मराठी, कन्नड आणि तेलुगु भाषेत सुरुवात करून सोलापूरकरांमध्ये उत्साह संचारला होता त्यामुळे यावेळी काय बोलणार याकडेही सोलापूरकरांचे लक्ष होते. यावेळी त्यांनी श्री विठ्ठल श्री सिद्धेश्वर महाराज यांना नमन केले, मराठी बोलताच उपस्थित म्हणून एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.
दरम्यान मोदी हे आपल्या भाषणात मराठी कसे बोलतात यावर अनेक जण विचार करतात परंतु ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम आहे त्यांच्या भाषण करण्याचे माईक पूर्णपणे एका बाजूला असते आणि इतर जे नेते भाषण करतात त्यांची माहिती एका बाजूला मोदी यांच्या माईकच्या समोर दोन टेलिप्राँटर असतात, त्यांना जे काही मराठी बोलायचे आहे ते त्या टेलिफोनवर दिसते ते ते वाचतात आणि एकदा डावीकडील टेलिप्राँटर मध्ये बघतात नंतर उजवी कडील टेलिप्राँटर मध्ये बघून बोलतात. त्यामुळे त्यांना वाचून बोलायला सोपे जाते.