उमेश पाटील, विजयराज डोंगरे यांना जावे लागणार आता अनगरला ; राजन पाटलांनी करून दाखवले !
सोलापूर : राज्याच्या महसूल विभागाने 24 जुलै रोजी जीआर काढून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अनगर येथे अपर तहसील कार्यालय मंजूर केले आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांचा ही पाठपुरावा महत्वाचा ठरला आहे.
महसूल विभागाने काढलेल्या आदेशात मोहोळ तहसील मध्ये आता मोहोळ, सावळेश्र्वर, टाकळी सिकंदर, कामती बु, वाघोली ही महसुल मंडळे तर अनगर या अपर तहसील कार्यालय अंतर्गत अनगर, शेटफळ, नरखेड आणि पेनुर ही मंडळे येणार आहेत.
या अपर तहसील कार्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी विरोध केला होता. पण त्यांचे नरखेड हे महसूल मंडल आल्याने त्यांना आता शासकीय कामकाजासाठी अनगरला जावे लागणार आहे. तसेच भाजप नेते माजी सभापती विजयराज डोंगरे यांचेही शेटफळ हे महसूल मंडळ अप्पर तहसील कार्यालयाला जोडल्याने त्यांनाही आता नाईलाजाने शासकीय कामकाजासाठी तिकडे जावे लागणार आहे. राजन पाटील यांचे विरोधक मानाजी माने यांचेही पेनुर हे महसूल मंडळ अनगर अपर तहसील कार्यालयाला जोडले आहे.