उज्वला थिटे पहाटेच अनगर मध्ये दाखल ; फोटो, व्हिडिओ आले समोर
अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाला इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्या उज्वला थिटे या आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी पहाटेच अनगर मध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याचा आज सोमवारचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी त्यांचे उमेदवारी जाहीर केली आहे. रविवारी उज्वला थिटे यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी अनगरला जात असताना त्यांना माजी आमदार राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अडवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांचे काही व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.




















