सोलापुरातील या मंजूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ; राजश्री चव्हाण यांची आयुक्तांकडे तक्रार
गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग 26 मधील माडा कॉलनी डी मार्ट पाण्याची टाकी ते बॉम्बे पार्क दरम्यानचा रोड अत्यंत खराब झाला होता. अनेक नागरिक, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक पडून जखमी होत होते. याबाबत माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना जवळपास तीन निवेदने दिली होती त्याची दखल घेत शासनाच्या धूळ मुक्त योजनेअंतर्गत सदर रस्त्याचे कामे मंजूर झाले व त्याचे टेंडर ही निघाले. प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली परंतु वास्तविक पाहता मंजूर इस्टिमेट प्रमाणे कामे करणे अपेक्षित होते. पण झाले उलटेच.
सदर ठेकेदार यांनी इस्टिमेटप्रमाणे सदरचा रोड करताना प्रथम एक फूट खोदुन घेऊन त्यात 60 एम.एम. व 40 एम एम खडी टाकून त्यावर मुरूम टाकून रोलिंग करून नंतर डांबरीकरणाचे तीन लेयर करणे, रिफ्लेक्टर, रस्त्याच्या मधोमध पांढऱ्या पट्ट्या,अपेक्षित असताना. तसे न करता ठराविक ठिकाणीच खडी टाकून पॅच मारून घेतले. व नंतर त्यावरच कमी प्रमाणात डांबर वापरून फक्त एक लेयर मारून रस्ता तयार करीत असले बाबत निदर्शनास आले आहे.
भविष्यात सदरचा रोड पावसाळ्याआधीच उखडून जाण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदारना विचारले असता उडवा उडवीचे उत्तरे मिळत आहेत. हे लक्षात आल्यानंतर प्रभागातील सुजाण नागरिक व भाजप पदाधिकारी यांनी राजश्री चव्हाण यांनी सदरचा निकृष्ट दर्जाचे रोडची चौकशी करून संबंधित ठेकेदार यांना काळया यादी टाकून व त्या ठेकेदाराला मदत करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे.
असे निवेदन दिले असून भविष्यात प्रभाग 26 मध्ये शासनाची होत असलेली कामे इस्टिमेट प्रमाणेच व्हावीत यासाठी यासाठी आम्ही दक्ष राहणार आहोत कुठलेही निकृष्ट दर्जाचे कामे दिसून आल्यास संबंधित ठेकेदार यांना काळया यादीत नाव समाविष्ट करण्यात येईल व संबंधित ठेकेदारांना मदत करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येईल असे मनोगत माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.