सोलापूर : जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसिलदार संघटना सोलापूर शाखेचे अध्यक्ष सुशील बेल्हेकर म्हणाले, नायब तहसीलदार संवर्गाचे ग्रेड वेतन 4800 करणेबाबत शासन स्तरावरून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. उपमुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त) यांनी मान्यता दिल्यानंतर सुद्धा आतापर्यंत शासन निर्णय का काढण्यात आला नाही ! याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे, मागणी केलेले पेड पे मंजूर झालेला नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या सदस्यांची नाराजी तीव्र झालेली आहे. सदस्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरु करण्याबाबत संघटनेने निर्णय घेतला आहे.
या आंदोलनात तहसीलदार सैपन नदाफ, दत्तात्रय मोहाळे, चंद्रशेखर लिंबारे, बाळासाहेब शिरसाट, संजय भंडारे, सुधाकर बंडगर, बालाजी बनसोडे, आर व्हि पुदाले, जयश्री पंचे, स्मिता गायकवाड, मदन जाधव, आरती दाबाडे, चंद्रकांत हेडगिरे, प्रवीण घम, मनोज सोत्री, दत्तात्रय गायकवाड, ए एस गेंगाने, समीर यादव, विजय कवडे, आर आर कुरणे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे नेते शंतनु गायकवाड यांच्यासह तहसीलदार व नायब तहसीलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.