सोलापूर : एम आय एम पक्षामध्ये बराच दिवस नाराज राहिलेले माजी नगरसेवक तौफिक शेख राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वाढते वर्चस्व पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निश्चय घेतला राज्यामध्ये सत्ता बदलली तरी पण तोफिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तोफिक शेख हे सक्रिय दिसून आले. राज्यात सत्ता बदलली शिंदे फडणवीस सरकार आले, त्यानंतर परत एक वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, अजित पवार हे सत्तेत जाऊन मिळाले. त्यामुळे बरीच समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक नेते, कार्यकर्ते अजित पवार यांच्या गटात जाऊ लागले आहेत.
सोलापुरात मधल्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांच्या गटाच्या शहर युवक अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. त्यामध्ये तोफिक शेख यांनी नजीब शेख यांच्या बाजूने प्रयत्न केला. तशाप्रकारे फिल्डिंग पण लावली होती, मुंबईमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या परंतु या निवडीमध्ये तोफीक शेख यांचा हिरमोड झाला आणि महेश कोठे यांनी बाजी मारत आपल्या समर्थकांना पदे देण्यास वरिष्ठांना भाग पाडले.
तेव्हापासून तोफिक शेख हे काहीसे नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते अजित पवार गटात लवकरच प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. भविष्यातील महानगरपालिकेच्या दृष्टीने तोफिक शेख यांना अजित पवार गटात गेल्यानंतर निश्चित फायदा होईल असेही बोलले जात आहे.