सोलापुरात एमआयएमतर्फे हजला जाणाऱ्या भाविकांची अशी ही सेवा ; आरोग्याची घेतली काळजी
सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक मुस्लिम भाविक यंदा हज ला जाणार आहेत. दरवर्षी हजारो भाविक सौदी अरेबिया देशातील मक्का मदिना येथे जगभरातून दाखल होतात. विविध देशांतील नागरिकांच्या संपर्कात आल्याने भारतीय मुस्लिमाना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोलापुरातून जाणाऱ्या मुस्लिम भाविकांसाठी एमआयएम मेडिकल विंग तर्फे विविध प्रकारचे औषधं वाटप करण्यात आली.
सोमवारी दुपारी सोशल हायस्कूल येथे औषध वाटप करत, पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातुन जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आले होते.
सालाबादप्रमाणे याही वर्षी एमआयएम मेडिकल विंग तर्फे औषध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर शहरात औषध प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या विविध मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह यांनी एकत्रित येत एमआयएम मेडिकल विंग स्थापन केली आहे. हाजी फारूक शाब्दी यांचा या मेडिकल विंगला मोठा पाठिंबा आहे. एमआयएम पक्षात मेडिकल विंग शहरात विविध सामाजिक कार्यक्रम घेत असते.