सुभाष देशमुखांनी केले प्रणिती शिंदेंचे अभिनंदन ! धैर्यशील मोहितेंनी बापूंचे घेतले आशीर्वाद
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेतला. या बैठकीला नूतन खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच राजकीय नेते एकमेकांसमोर आलेले पाहायला मिळाले. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी प्रणिती शिंदे यांचे खासदार झाल्याबद्दल अभिनंदन केले. नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुभाष देशमुख यांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेताना बापू मी त्यांना उचलून आपली गळाभेट घेतली.
यावेळी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींनी तो व्हिडिओ आपल्या कॅमेरा टिपला. यावेळी सोलापूर शहराच्या पाणी प्रश्न, आरोग्य, महावितरण, कृषी या महत्त्वाच्या विषयांवर आमदार सुभाष देशमुख यांच्या जोडीला खासदार प्रणिती शिंदे यांनी आपले मुद्दे मांडत प्रशासनाला सूचना केल्या.