सोलापूरकरांची फसवणूक थांबवा, अभ्यासु आणि सुसंस्कृत उमेदवार द्या….
कोणत्याही क्षणी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग जाहिर करेल, गेल्या कैक वर्षांपासून केंद्रीय स्थरावर अभ्यासपूर्ण आणि ठामपणे सोलापूरचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी लोकसभेत सोलापूरकरांनी निवडुन न दिल्यामुळे सोलापूरचे आतोनात हाल झाले आहे. दैनंदिन पाणीपुरवठा, शहर परिवहन विमानसेवा, उड्डाणपूल, बाह्या वळण, रेल्वे, स्थानिक स्वराज्य संस्थांतील विविध प्रलंबित प्रश्न जे केंद्रीय पातळीवर सहज सोडवता येऊ शकता त्या करिता सोलापूरकरांनी निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या वतीने गेल्या कैक वर्षांपासून काहीच हालचाल दिसत नसल्याने सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरकरांची फसवणूक थांबवा, अभ्यासु आणि सुसंस्कृत उमेदवार द्या असे आवाहन शासकीय विश्रामगृहात सोलापूर विकास मंचच्या वतीने आयोजित बैठकीत सर्व सोलापूरकरांनी सर्व प्रमुख पक्षांना केले.
सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विनंतीवरून केंद्रीय रेल्वेमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समवेत सोलापूरच्या रेल्वे विभागाच्या संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवरच्या बैठकीत मंचचे प्रतिनिधी विजय कुंदन जाधव हे नवी दिल्ली येथे उपस्थित होते.
सदर बैठकीत नंतर तातडीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोलापूर विभागाशी संबंधित सर्व मागण्या, सूचना आणि तक्रारींवर रेल्वे बॉर्डास निर्देश दिले. सदर दौर्या दरम्यान विजय कुंदन जाधव यांनी एस.के.जाधव, प्रायव्हेट सेक्रेटरी, मिनिस्ट्री अॉफ स्टेट रेल्वे, कोल अँड माईंन्स, गव्हर्न्मेंट अॉफ इंडिया, संजीव देशपांडे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पब्लिक ग्रीव्हेन्स, मिनिस्ट्री अॉफ रेल्वे, के.एस.नारायण स्वामी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, डॉ. राजेश सर्वज्ञ, अध्यक्ष, विवेकानंद युथ कनेक्ट, ए.वैभवकुमार, अॅडिशनल पी.एस. मिनिस्ट्री अॉफ स्टेट, मिनिस्ट्री अॉफ माईंस, रोहिणी भाजीभाकरे, प्रायव्हेट सेक्रेटरी टु मिनिस्टर अॉफ स्टेट फॉर एज्युकेशन, वारसा संगोपनासाठी भारतभरात अतिशय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या इंटॅक ह्या संस्थेच्या प्रिंसिपल डिरेक्टर पौर्णिमा दत्ता यांची नवी दिल्लीच्या मुख्य कार्यालयात सदिच्छ भेटी देत सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषयांवर निवेदने सादर केली.
सोलापूरकरांचे मुलभूत महत्वाचे प्रश्न अभ्यासपूर्ण आणि ठामपणे सभागृहात मांडणाऱ्या तथा केंद्र सरकारच्या सर्व योजना आणि स्कीम्सचा जास्तीत जास्त लाभ सोलापूरकरांना करुन देणार्या उमेदवारलाच सोलापूरकरांनी निवडुन देण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.
ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले, केतन शहा, योगिन गुर्जर, अॅड.दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षिरसागर, सुहास भोसले, आनंद पाटील, विजय कुंदन जाधव,जयश्री तासगावकर, आरती अरगडे, गौरी आमडेकर, महेश हणमे, मारुती नारायणकर, रमेश माळवे, संजय खंडेलवाल, रमेश माळवे, अकबर मुजावर, सुनीलकुमार शिंदे, श्रीकांत टाकळीकर, इक्बाल हुंडेकरी, तानाजी गर्जे, गणेश शिलेदार, गोविंद पाटील, प्रशांत भोसले, तुकाराम चाबुकस्वार, आनंद कुलकर्णी, सुर्याकांत पारेकर, शुभम घोलप, वरुण जाकोटिया, शफी काझी, श्रीनिवास पोट्टाबत्ती, सुशीलकुमार व्यास आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.