सोमनाथ वैद्य यांचे तीन ही अर्ज मंजूर; दक्षिण मध्ये चमत्कार घडवणार ; केला यांचा निर्धार
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आज झालेल्या छाननीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून एड. सोमनाथ वैद्य यांचे तिन्ही उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, दक्षिण सोलापुरातील जनतेचे मला खंबीर पाठबळ आहे. त्यामुळे दक्षिणची ही निवडणूक 1 हजार टक्के लढविणार आणि जिंकणारच, असा विश्वास एड. सोमनाथ वैद्य यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या चार महिन्यापासून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. सुरुवातीपासूनच अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती परंतु मध्यंतरीच्या काळात भाजपच्या सात ते आठ माजी नगरसेवकांनी मला पाठिंबा दिला होता. त्यानंतर भाजपचे तिकीट मागण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे विनंती केली होती परंतु भाजपच्या संसदीय बोर्डाने मला तिकीट नाकारले. भाजपाने दक्षिण मतदारसंघातून आ. सुभाष देशमुख यांना तिकीट दिले. त्यांचे मी अभिनंदन केले आहे.
मला संविधानाने निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मी तीन उमेदवारी अर्ज भरले होते. आज उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये माझे तीनही उमेदवारी अर्ज मंजूर झाले आहेत. दरम्यान, दि. 4 नोव्हेंबरला दुपारी तीन नंतर निवडणूक चिन्ह मिळणार आहे. त्यानंतर 24 तासाच्या आत मी माझे निवडणूक चिन्ह दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सुमारे साडेतीन लाख मतदारांपर्यंत पोहोचविणार आहे. त्यासाठी मी पूर्वतयारीही केली आहे.
मी मंत्रालयात व विधान सभेमध्ये वयाच्या 23 व्या वर्षापासून काम पाहत आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याची माझी तळमळ आणि ध्यास आहे. यामुळे मी 1 हजार ही निवडणूक लढविणार आहे. तीही ताकदीने लढविणार आहे. या मतदारसंघात एकास एक फाईट होणार नसून बहुरंगी लढत होणार आहे. जनतेचा मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जनता केवळ मलाच ताकद देईल. दक्षिण सोलापुरातील जनता हाच माझा पक्ष आहे. या जनतेच्या आधारावर ही निवडणूक मी लढविणार आणि जिंकणारच आहे, असा दावा एड. सोमनाथ वैद्य यांनी केला आहे.
दक्षिणच्या जनतेला न्याय
मिळवून देण्यासाठी ही लढाई
वीस वर्षे मंत्रालयातील प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव आहे. यापूर्वी पाच निवडणुका मी पाहिल्या आहेत. मला राज्यघटनेने अधिकार दिला आहे. मी स्वतः एक वकील आहे. मी आतापर्यंत प्रचंड मोठे काम केले आहे. तगडा अनुभव पाठीशी आहे. निवडणुकीची ही लढाई दक्षिणच्या जनतेला न्याय मिळावा. सर्वांगीण विकास व्हावा म्हणून मी लढत आहे. त्यांना 24 तास उपलब्ध होणारा आमदार मिळावा म्हणून मी निवडणुकीच्या रणांगणात उभारलो आहे,असे अपक्ष उमेदवार ऍड. सोमनाथ वैद्य यांनी स्पष्ट केले.