सोलापूर महापालिका निवडणूक आरक्षण जाहीर ; राजेश काळे, मनोज शेजवाळ, प्रवीण निकाळजे यांची अडचण
सोलापूर : संपूर्ण सोलापूर शहराचे लक्ष लागलेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयुक्त सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
सुरुवातीला प्रभाग 25 व 26 हे प्रभाग तीन सदस्यीय असल्याने त्यामध्ये दोन महिलांचे आरक्षण चिठ्ठी काढण्यात आली त्यात प्रभाग 25 हा सरळ दोन महिलांसाठी आरक्षित झाले.
त्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 15 जागांपैकी 8 चिठ्ठ्या या महिलांच्या काढण्यात आल्या. त्यामध्ये 25, 13, 15, 4, 6, 21, 26, 17 हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. यामध्ये माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नूतन गायकवाड, वंदना गायकवाड या सेफ झाल्या आहेत तर शिवसेना नेते मनोज शेजवाल, शिवा बाटलीवाला, सुभाष शेजवाळ, यांची अडचण झाल्याचे दिसून येते.
अनुसूचित जमातीच्या दोन जागांमध्ये प्रभाग 24 मधील एक जागा महिलांसाठी थेट आरक्षित झाली आहे त्यामुळे माजी उपमहापौर राजेश काळे यांना धक्का बसला. ही जागा आरक्षित होताच ते सभागृह सोडून नाराज चेहऱ्याने निघून गेले.
ज्या प्रभागात ना.मा.प्र. च्या दोन जागा राखीव होतील त्या प्रभागामधील एक जागा ना.मा.प्र. महिलांकरीता थेट राखून ठेवण्यात येईल. त्यामध्ये प्रभाग 14 व 18 हे थेट राखीव झाले.
ज्या प्रभागात अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीची जागा आहे मात्र ती जागा महिलांकरीता आरक्षित झालेली नाही अशा प्रभागातील ना.मा.प्र.ची जागा थेट ना.मा.प्र. महिला राखीव होईल. त्यामध्ये प्रभाग 1, 2, 5, 16, 22, 23 या सहा जागा थेट OBC महिला राखीव झाले. आणि चिठ्ठ्यामधून 9, 12, 3, 8, 11, 7 हे OBC महिला राखीव झाले.
सर्वसाधारण महिलांच्या जागा निश्चित करण्याकरीता सोडत काढण्याची आवश्यकता नाही. या जागा केवळ महिलांचे प्रमाण पूर्ण करण्याकरीता आवश्यक असलेल्या संख्येइतक्या जागा त्या त्या प्रभागात वाटप करुन देण्यात आल्या. त्यामुळे 58 सर्वसाधारण जागेपैकी त्यामध्ये 28 सर्वसाधारण जागा या महिलांसाठी राखीव झाले आहेत.





















