सोलापूर महापालिका निवडणुकीचे आरक्षण पुन्हा निघणार ; निवडणूक आयोगाचे आदेश
सोलापूर : राज्य निवडणूक आयोगामार्फत आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार नवी मुंबई, उल्हासनगर, पनवेल, मालेगाव, जळगाव, सोलापूर, इचलकरंजी आणि जालना या महानगरपालिकांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला या प्रवर्गांकरिता पुनश्च आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील वरील प्रवर्गांसाठीची आरक्षण सोडत दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे सकाळी 10:30 वाजता पार पडणार आहे.
सदर कार्यक्रमास संबंधित जनप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक नागरिक तसेच माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, अशी माहिती महानगरपालिकेमार्फत देण्यात आली आहे.



















