








सोलापूर महापालिकेसाठी सहा अर्ज दाखल ; दिवसभरात कोण आले अन् कोण गेले !
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी राहू काळ असल्याने उमेदवाराचा निरुत्साह दिसून आला. पण अनेकांनी उमेदवारी अर्ज नेले.
शुक्रवार दिनांक २६ रोजी ६ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. त्यामध्ये प्रभाग दहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रुग्णसेवक रूपेशकुमार भोसले यांच्या संपूर्ण पॅनल ने आपले अर्ज भरले. १)प्रभाग १२-ब (पुरुष )
२)प्रभाग १०-अ (महिला)
३)प्रभाग १०-ब (महिला)
४)प्रभाग १०-क (पुरुष)
५)प्रभाग १० (पुरुष)
६)प्रभाग — ११ (पुरुष )एका उमेदवाराने दोन नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहेत.
सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील महसूल उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी निवडणूक कार्यालयात येऊन सर्व यंत्रणेची पाहणी केली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्ती आहेत त्यामुळे येथे उपस्थित सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांना प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी कॉफीसाठी इन्व्हाईट केल्याचे दिसून आले.
पूर्वाश्रमीच्या वंचित आणि एमआयएम नेत्या रेश्मा मुल्ला यांनी दोन उमेदवारी अर्ज नेले आहेत. परंतु त्यांनी आपला पक्ष आणि वॉर्ड गुलदस्त्यात ठेवला आहे.
आमदार विजयकुमार देशमुख समर्थक संजय कोळी यांनी पण बराच वेळ थांबून उमेदवारी अर्ज प्रक्रियेची माहिती घेतली. सध्याच्या राजकीय समीकरणामुळे ते थोडे चिंतेत पहायला मिळाले.
प्रभाग चारच्या विद्यमान नगरसेविका वंदना गायकवाड या आपले पती अजित गायकवाड आणि सहकारी नगरसेविका पती राजाभाऊ काकडे यांच्या सोबत येऊन उमेदवारी अर्ज नेला.
माजी नगरसेविका अनुराधा काटकर आणि माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे हे चर्चा करत थांबले होते. प्रभाग तुटल्याने प्रवीण निकाळजे आता हे आपल्या कन्येला प्रभाग 21 मधून उभे करण्यात आहेत. त्यामुळे अनुराधा काटकर या प्रभाग 20 मधून निवडणूक लढत आहेत निकाळजे सोबतीला आता भीमाशंकर टेकाळे यांच्या असून बाई उभ्या राहणार आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते यु एन बेरिया हे सुद्धा निवडणूक कक्षात दिसून आले त्यांचे चिरंजीव नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत.
आम आदमी पक्षाचे जुबेर हिरापुरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून ते प्रभाग क्रमांक 14 मधून इच्छुक आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शकील मौलवी हे निवडणूक केंद्रात बसून होते. त्यांच्याशी प्रभाग क्रमांक पंधरा बाबत चर्चा केली असता माजी महापौर आरिफ शेख यांच्या ऐवजी त्यांच्या कन्या या प्रभागातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
माजी नगरसेविका परविन इनामदार यांचे पती रफीक इनामदार हे माजी उपमहापौर सय्यद यांच्या चिरंजीव सोबत निवडणूक कार्यालयात आले होते. ते सध्या काँग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेले असल्याची माहिती मिळाली.
महेश कोठे नसल्याने त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा करणारे विठ्ठल कोटा हे सुद्धा निवडणूक कार्यालय दिसून आले.




















