सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का ; धवलसिंह मोहिते पाटील यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
सोलापूर : विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला असून जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे.
धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपला सहा पानाचा राजीनामा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे दिला आहे. पक्षामध्ये होत असलेली घुसमट त्यांनी या राजीनामा पत्रातून व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची थेट भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता धवलसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार का? अशी चर्चा सुरू असून भाजप राष्ट्रवादीच्या मोहिते पाटील यांना दाबण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर घेतील असेही कार्यकर्ते बोलू लागले आहेत.