सोलापुरात काँग्रेसला धक्का ; अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख यांचा तडकाफडकी राजीनामा
सोलापूर : शहर काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख यांनी आपले पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून हा सोलापूरच्या काँग्रेसला एक धक्का मानला जात आहे. या राजीनाम्यानंतर भाई पुन्हा घर वापसी करणार का अशा चर्चेने आता जोर धरला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असताना नजीब शेख हे युवक अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते परंतु तत्कालीन नेते महेश कोठे यांनी आपल्या समर्थक अक्षय वाकसे यांच्या गळ्यात युवक अध्यक्ष पदाची माळ घातली. त्यानंतर नाही प्रणिती शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून काँग्रेस पक्ष प्रवेश केला, काँग्रेस पक्षाने त्यांना अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष पदावर संधी दिली.
लोकसभा निवडणुकीत खासदार ताईंना निवडून आणण्यात नजीब शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीत शहर मध्य मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम कार्यकर्त्याला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न झाले परंतु पक्षांनी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बरेच जण नाराज झाले शौकत पठाण, माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे या प्रमुख नेत्यांनी एमआयएम मध्ये जाणे पसंत केले. बाबा मिस्त्री यांनी पण काँग्रेसचे साथ सोडली.
आता अचानक नजीब शेख यांनी आपल्या अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष परसह काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची खात्रीशीर माहिती समोर आले आहे.





















