फारुख शाब्दी यांच्या भूमिकेकडे सर्वच पक्षांचे लक्ष ; भाई पतंग तो निर्णायक ठरणे वाली है!
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणूक लागली असून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीला सज्ज असल्याचे पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टीने स्वबळाचा नारा दिल्याने सत्तेतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सुद्धा आता स्वतंत्र लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.
दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आघाडी झाली आहे मात्र एमआयएम या पक्षाची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही.
2017 च्या निवडणुकीत एमआयएम स्वतंत्र लढल्याने काँग्रेस पक्षाला त्याचा फटका बसला होता त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा फायदा झाला. यंदा महाविकास आघाडी एमआयएम पक्षाला सोबत घेण्याची तयारी करत आहेत पण एम आय एम ने अजून आघाडी करण्याचा निर्णय घेतला नाही.
एम आय एम पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दि हे मात्र अजूनही वेट अँड वॉच भूमिकेत दिसून येत आहेत. निवडणूक लागली असून 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे पण अद्यापही एमआयएमच्या हालचाली दिसत नाहीत. पक्षातील काही नेते आपकी बार 40 पार अशा बढाया मारत आहेत पण ते शक्य नाही.
प्रभाग 14, प्रभाग 16, प्रभाग 17, प्रभाग 18 प्रभाग 22 प्रभाग 20 यामध्ये मुस्लिम समाजाची सर्वाधिक मते आहेत त्यामुळे या प्रभागात एम आय एम स्वतंत्र लढला तर त्या ठिकाणी निश्चितच काँग्रेस महाविकास आघाडीला फटका बसणार आहे आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला होईल अशी चर्चा ऐकण्यास मिळते.




















