सोलापुरात आसाराम बापूंच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज रस्त्यावर ; मोठ्या पदयात्रेने वेधले लक्ष
सोलापूर : तुरुंगात शिक्षा भोगत असलेले संत आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने ही पदयात्रा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार व्हावा म्हणून पेरोलवर सोडावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
८६ वर्षाचे संत आसाराम बापू यांची तब्येत खुप बिघडली आहे त्यांना हृदयात ब्लोकेज आहेत. त्यांना जोधपूर AIIMS याठिकाणी उपचार चालू आहे. पण तिथे नीट उपचार मिळत नाही त्यांना आयुर्वेदिक उपचार पद्धती लागू होते वारंवार मागणी करून ही एखाद्या आतंकवाद्यां पेक्षा वाईट वागणूक त्यांना मिळत असून उपचारासाठी सुद्धा कोणतीही मुभा त्यांना मिळत नाही. पॅरोल हा तर अतिशय गंभीर गुन्हेगाराचा पण अधिकार आहे. पण गेल्या 11 वर्षात त्यांना एक दिवस ही पॅरोल मिळाला नाही. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व त्यांना व्यवस्थित उपचार व पॅरोल किंवा उपचारासाठी जामीन मिळावा. यासाठी पदयात्रा व जिल्हाधिकारी यांना निवेदन आयोजन करण्यात आले.
हि पदयात्रा चार पुतळा, सिद्धेश्वर पेठ ते जिल्हा परिषद या मार्गाने होती. सकल हिंदू समाजातील संघटनेचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने या पदयात्रेत उपस्थित होते. त्याच बरोबर पूर्ण जिल्ह्यातून साधक परिवार ही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
त्यात प्रामुख्याने श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुराष्ट्र सेना, श्रीराम जन्मोत्सव समिती, सनातन संस्था, हिंदुजागरन मंच, अखिल भाविक वारकरी मंडळ, हिंदू महासभा, ओम् साई प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी व या सारख्या अनेक संघटनांनी या मध्ये सहभाग घेतला.
या पदयात्रेत अखिल भाविक वा. मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष हभप सुधाकर महाराज इंगळे, विश्व हिंदू परिषद प्रांत सदस्य व जिल्हा अध्यक्ष हभप लक्ष्मण महाराज चव्हाण, रवी गोने, आनंद मुसळे, संजय जमादार, संजय साळुंखे, अक्षय अंजिखाने, अंबादास गोरंटला, सुधीर बहिरवाडे, पुरुषोत्तम करकाल, शिवराज गायकवाड, प्रवीण गुर्रम व अनेक संघटनाचे प्रमुख या पदयात्रा व आंदोलनात उपस्थित होते.