




दुःखद ! ज्येष्ठ पत्रकार बळीराम सर्वगोड यांचे अपघाती निधन
सोलापुरातून अतिशय दुःखद बातमी समोर आली असून ज्येष्ठ पत्रकार बळीराम सर्वगोड यांचे शुक्रवारी रात्री अपघाती निधन झाले आहे. याबाबत त्यांचे चिरंजीव शुभम सर्वगोड यांच्याकडून अधिकृत माहिती मिळाली.
मयत बळीराम सर्वगोड हे दैनिक सुराज्य मध्ये कार्यरत होते. काम संपवून रात्री साडेनऊच्या सुमारास ते आपले गावी उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथे आपल्या स्प्लेंडर एम एच 13 डी एक्स 7931 या दुचाकी वरून जात असताना बाळे पुलावर त्यांना पाठीमागून एम एच 13 सी जी 3015 या होंडा स्कुटी या वाहनाने जोराची धडक दिली. होंडा स्कुटी वाले गाडी सोडून तिथून फरार झाले. त्यामुळे या धडकेने त्यांची गाडी पुलावरील डिव्हायडरला जाऊन ठोकली त्यात डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असून नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे. सर्वगोड त्यांच्यावर बीबी दारफळ या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून याबाबत वेळ दुपारनंतर सांगण्यात येणार आहे.
सर्वगोड हे खालील 30 ते 35 वर्षापासून सोलापुरात पत्रकारिता करत होते. यापूर्वी त्यांनी अनेक वर्ष दैनिक केसरी मध्ये काम केले आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे.




















