सचिनदादांच्या अवतीभवती इच्छुकांची भाऊगर्दी; बोरामणी गटातून चुरस, हे आहेत संभाव्य
सोलापूर : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद सदस्य पदाच्या आरक्षणानंतर इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तीन जिल्हा परिषद गटातून या मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अवतीभवती उमेदवारांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळते.
त्यातल्या त्यात या मतदारसंघातील बोरामणी जिल्हा परिषद हा गट खुला झाल्याने या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
या भागातील जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते सिद्धाराम हेले, उळे गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा सचिन कल्याणशेट्टी यांचे समर्थक नेताजी खंडागळे, कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, बोरामणीचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे समर्थक शिवसेना नेते धनेश अचलारे तसेच शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख अनिता माळगे, काँग्रेस नेते, माजी सरपंच विजय राठोड, संदीप राठोड यांची नावे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
बोरामणी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणाहून आजपर्यंत स्वर्गीय नेते उमाकांत राठोड हे निवडून जायचे आता मात्र राजकीय समीकरणे बदलली आहेत. या भागात काँग्रेसला नेतृत्व दिसत नाही तरीही मतदार हा काँग्रेस सोबत असल्याचे लोक सांगतात. त्यामुळे उमाकांत राठोड यांचे चिरंजीव विजय राठोड हे इच्छुक असल्याचे दिसून येते.
बोरामणी मतदारसंघ घरी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरी सध्याची परिस्थिती पाहता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे या भागात वर्चस्व पाहायला मिळते. त्यामुळे इच्छुक वाढले आहेत. तांदुळवाडी चे सिद्धाराम हेले हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांचा या भागाचा दांडगा संपर्क आहे. पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांचा पक्ष विचार करू शकतो.
मागील अनेक दिवसांपासून उळे गावचे नेताजी खंडागळे यांनी पण या मतदारसंघात आपली मोर्चेबांधणी केली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले आहेत सामाजिक कार्यातून त्यांनी आपली त्या भागात छाप सोडण्याचे दिसून येते.
कासेगाव चे सरपंच यशपाल वाडकर हे सुद्धा इच्छुक आहेत त्यांचे वडील स्वर्गीय श्रीकांत वाडकर यांची या भागात चांगली ओळख होती, सचिन कल्याणशेट्टी यांच्या जवळचे वाडकर मानले जातात.
मळेगाव दांड्याचे संदीप राठोड हे सुद्धा इच्छुक आहेत मागील अनेक वर्षापासून ते या भागात काँग्रेसला टफ देत आहेत. या भागात बंजारा समाजाची मते मोठ्या प्रमाणात असल्याने संदीप राठोड यांना संधी मिळणार का याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पूर्वी काँग्रेस आणि आताचे शिवसेनेमध्ये असलेले धनेश आचलारे हे सुद्धा दावेदा जातात. यापूर्वी ते पंचायत समिती सदस्य होते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे कट्टर समर्थक असल्याने आता आचलारे यांच्यासाठी म्हेत्रे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेच्या महिला आघाडीच्या राज्याच्या समन्वयक अनिता माळगे या सुद्धा बोरामणी गटातून इच्छुक आहेत. त्यांनी आपल्या महिला संघटनेच्या माध्यमातून या भागात त्या घरोघरी पोहोचले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. आता त्यांना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची पण ताकद मिळाली असल्याने आगामी निवडणुकांसाठी जर युती नाही झाली तर आणि त्यामागे या निश्चित उमेदवार म्हणून या गटातून निवडणूक लढवतील हे नवल वाटायला नको.




















