‘वंदे भारत’मध्ये सोलापूरच्या भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे चिंतन
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा पराभव झाला. काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महायुती होती.
या निवडणुकीत जातीय समीकरणे पाहायला मिळाली, शेवटच्या टप्प्यात हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने प्रचारात झाला परंतु एकूणच देशात बदललेली समीकरणे, शेतकऱ्यांमधील नाराजी, मराठा आरक्षणाचा मुद्दा, नाराज असलेल्या मुस्लिम समाज यामुळे भाजपला सोलापुरात पराभवाला सामोरे जावे लागले.
दरम्यान सोमवारी सोलापूर हुन मुंबईला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस मधील एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह अजित पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी यांच्यासह इतर महायुतीचे पदाधिकारी या निवडणुकीचे चिंतन करताना पाहायला मिळाले.
शहराध्यक्ष नरेंद्र काळे हे राम सातपुते यांच्यासोबत कायम दिसून आले, आनंद चंदनशिवे यांनीही भाजप उमेदवार सातपुते यांचा जोरदार प्रचार केला होता. सोलापुरात अद्याप ही भाजपच्या पराभवाचे चिंतन झाले नसल्याचे पाहायला मिळते.