रविकिरण शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन ; विद्यार्थ्यांनो खेळातून बौद्धिक, शारीरिक विकास साधा
रविकिरण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी प्राथमिक शाळा, श्री दत्त मराठी विद्यालय, श्री दत्त प्रशाला व ज्युनिअर कॉलेज श्रीशैल नगर सोलापूर येथे 18 डिसेंबर 2023 रोजी क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी संतोष घोलप होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी रणजी क्रिकेटपटू बाळ दळवी, जिल्हा क्रीडा संघटनेचे अध्यक्ष दशरथ गुरव यांची उपस्थिती होती. साने गुरुजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका चैताली जुगदार, सुरवसे मॅडम, श्री दत्त मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता शिवपुजे व श्री दत्त प्रशालेचे मुख्याध्यापक सातलिंग शटगार उपस्थित होते.
यावेळी बोलताना घोलप यांनी खेळामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक विकासा बरोबरच शारीरिक विकास होतो तसेच सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करीत असतो त्यामुळेच सर्वांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे असे आवाहन केले.
दशरथ गुरव यांनी विद्यार्थ्यांनी खेळामध्ये प्राविण्य मिळवून स्वतःचे करिअर घडवावे त्याचबरोबर देशसेवा करावी असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
बाळ दळवी यांनी महापालिकेकडे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्याची मागणी केली.
यावेळी क्रीडा साहित्याची पूजा करून व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया भांगे यांनी केले तर आभार सुप्रिया पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तीनही शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यानी परिश्रम घेतले .