नविन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रगती करा ; झेडपी नंबर वन पतसंस्थेने केला गुणवंत पाल्यांचा सत्कार
सोलापूर दि. २१ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नि. नं. १ सोलापूर या पतसंस्थेच्या वतीने सभासदांच्या गुणवंत पाल्याचा सत्कार सभारंभ आज के यशवंतराव चव्हाण सभागृहात अमोल जाधव उप मुख्यकार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता जि. प. सोलापूर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र लोक सेवा आयोग यांचे मार्फत घेतलेल्या परिक्षेमध्ये राज्यात मुलीमध्ये प्रथम कमांकाने उत्तीण झालेल्या कु. वैष्णवी राम गायकवाड हीचा प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी दहावी बारवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यश संपादन करणेसाठी पुणे येथेच गेले पाहीजे असे कांही नाही. आपण प्रयन्त व चिकाटीने आभ्यास करून समोर मोठे ध्येय ठेवले तर यश निश्चित मिळते असे या प्रसंगी बोलताना आपले मत व्यक्त केले.
यावेळी दहावीच्या २३ व बारावीच्या चार पाल्यांचा फाईल प्रमाणपत्र सन्मान चिन्ह व रोप देउन सत्कार करणेत आला. पत संस्था ही असे कार्यकम घेऊन पाल्यास एक प्रकारे प्रोत्साहन देणेचे चांगले काम करीत आहे – गुणवंत पाल्यांनी ए. आय ह्या नवीन तंत्राचा अवलंब करून आपली प्रगती केली पाहीजे. पालक आपल्या पाल्यास सुविधा देणेत कमी पडत नाहीत. त्यामुळे पाल्यांनी नवीन व जुन्या दोन्ही पिढीतील सुवर्ण मध्य साधला पाहीजे असे मत श्री. अमोल जाधव यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
सध्या मुलांचा बुध्यांक वाढला आहे. सर्व माहीती संकलीत करून स्वतःस घडविले पाहीजे. पालक पाल्यासाठी सर्व तोपरी प्रयत्न करीतच असतात. संस्थेचा हा कार्यक्रम पाल्याना उर्जा देणारा असलेचे मत मिरकले जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल कल्याण विभाग जि.प. सोलापूर यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. या वेळी मान्यवरांचा सत्कार चेअरमन व संचालक मंडळाचे वतीने करण्यात आला.
यावेळी नरेंद्र खराडे कार्यकारी अभियंता बांधकाम वि.१, जि.प. सोलापूर एच.सी. सपताळे कार्यकारी अभियंता जलसंधारण अधिकारी जि. प. सोलापूर चेअरमन डॉ. एस. पी. माने संचालक विष्णु पाटील , शहाजहान तांबोळी, श्रीधर कलशेटटी, तजमुल मुतवल्ली, विजयकुमार घेरडे, विशाल घोगरे, गजानन मारडकर, शिवानंद म्हमाणे, शिवाजी राठोड, किरण लालवोंदे, विकास शिंदे, चेतन वाघमारे, सौ. मृणालिनी शिंदे, श्रीमती स्वेता राऊत तज्ञ संचालक श्रीशैल देशमुख, नितीन शिंदे सचिव डी. एल. देशपांडे लेखनिक अशोक पवार, सुभाष काळे, नितीन येमुल, विनोद कदम आदीनी कार्यक्रम यशस्वी होणेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन विष्णु पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन नितीनंद शिंदे यांनी मानले.