“राजकीय सूडबुद्धीने घात केला” ! गुन्हा दाखल झाल्याने भाजप कार्यकर्ते विशाल गायकवाड यांची प्रतिक्रिया समोर
सोलापूर : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एका महिलेने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रभाग 24 मधून इच्छुक असलेल्या विशाल गायकवाड यांची आता चांगलीच अडचण झाली आहे. या मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्याने अडचणीत आलेल्या गायकवाड यांनी आपल्या फेसबुक खात्यातून स्वतः चा व्हिडिओ केला असून त्यात त्यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया देताना
“राजकीय सूडबुद्धीने घात केला. असंख्य वर्षाच्या राजकीय मेहनतीचे येत्या निवडणुकीत यश मिळणार असे वाटत असताना परफेक्ट वेळ साधत राजकीय हित शत्रूंनी माझ्यावर घाणेरडा डाव टाकला. तीव्र निषेध”. अशी पोस्ट पण केली आहे.
सध्या प्रभाग 24 वर अनेकांची नजर आहे. या प्रभागातून अनुसूचित जमाती महिलेसाठी राजेश काळे यांच्या पत्नी, ओबीसी महिलेतून विशाल गायकवाड यांच्या पत्नी, सर्वसाधारण जागेसाठी स्वतः विशाल गायकवाड, माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, मनीष देशमुख यांचेही नाव चर्चेत आहे. आता दिलीप माने हे भाजपात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.






















