महापालिका आयुक्त ऑन द स्पॉट ;गुडघ्या एवढ्या पाण्यात उभारून नागरिकांना दिला दिलासा ;यंत्रणेला तातडीचे आदेश
सोलापूर शहरांमध्ये गुरुवारी पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण सोलापूर जलमय झाले ते चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून पाहायला मिळत आहे. विशेष करून हैदराबाद रोडवरील जुन्या विधी घरकुल मध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर सुद्धा गुडघ्यावर पाणी अजून सुद्धा थांबून आहे. त्यामुळे या पावसाचा अंदाज येतो.
दरम्यान ही माहिती मिळताच महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तातडीने आपल्या यंत्रणे सह विडी घरकुल मध्ये पाहणी केली. यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख तसेच या भागाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनीसुद्धा आहेत पण सोबत पाहणी केली.
जुना विडी घरकुल परिसरासह मित्र नगर शेळगी या भागातील घरांमध्ये पाणी घुसले आहे. महापालिका आयुक्त स्वतः आल्याने नागरिकांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. आयुक्तांनी नागरिकांना दिलासा देताना आपल्या यंत्रणेला तातडीचे आदेश देत नाल्यांमधून नागरी वस्तीमध्ये घुसलेल्या पाण्याला वाट करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.