आमदार संजयमामांच्या फार्म हाऊसवर झालेल्या बैठकीत भाजपच्या रणजीतसिंह निंबाळकर यांना विजयी करण्याचा निर्धार
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली मात्र या उमेदवारीला माळशिरस मधून मोहिते पाटील गटांनी विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आमदार संजय शिंदे यांच्या टेंभुर्णी येथील फार्म हाऊस वर संपन्न झाली.
या बैठकीला आमदार जयकुमार गोरे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार राम सातपुते, दीपक साळुंखे, माजी आमदार दिलीप येळगावकर, कल्याणराव काळे, दिग्विजय बागल, राजकुमार पाटील बोरगावकर, चेतनसिंह केदार, जयकुमार शिंदे, अशोकराव जाधव, धनंजय साळुंखे पाटील, शंभूराजे जगताप, गणेश चिवटे, आप्पासाहेब देशमुख, भारत शिंदे, वामण उबाळे, के के पाटील, तानाजी झोल, बापू मोरे, बी वाय.राऊत, दादासाहेब उराडे, बाळासाहेब सरगर, अतुल पवार, दुर्योधन हिप्परकर,आनंदा माने, रावआण्णा सावंत, यांच्यासह माढा मतदारसंघातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
या बैठकीनंतर आमदार राम सातपुते यांनी माध्यमांशी संवाद साधला. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टी पार्लमेंटरी बोर्डाने म्हणजेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी उमेदवारी दिली आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या उमेदवाराच्या मागे उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे असे सांगून मोहिते पाटील यांच्या बंडखोरी बाबत बोलताना वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे त्यातून मार्ग निघ निश्चित निघेल आणि निंबाळकर हेच माढ्यातून खासदार होतील असा विश्वास सातपुते यांनी व्यक्त केला.