मनोज शेजवाळ -गणेश वानकर आमने सामने? दोन्ही शिवसेना भिडणार
सोलापूर : सोलापूर महापालिका आरक्षणामुळे आता सोलापूर शहरातील संभाव्य लढती जवळजवळ निश्चित झाल्या आहेत. यामध्ये सर्वात मोठी आणि लक्षवेधी लढत ही प्रभाग क्रमांक सहा मध्ये होण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.
सलग तीन वेळा नगरसेवक राहिलेले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते मनोज शेजवाळ यांचा प्रभाग अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. या भागात उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर हे मनोज शेजवाळ यांच्यासोबत 2017 च्या वेळी एकत्र निवडून आले होते यापूर्वी वानकर यांच्या आई शेजवाळ यांच्यासोबत नगरसेविका होत्या. आता मात्र राजकीय समीकरणे बदलली आहेत.
शेजवाळ हे एकनाथ शिंदे गटात आणि गणेश वानखडे उद्धव ठाकरे गटात आहेत त्यामुळे या प्रभागात मनोज शेजवाळ यांनी निवडणूक लढवायचे ठरवले तर त्यांना सर्वसाधारण म्हणून लढावे लागणार आहे आणि सहाजिकच ही लढत गणेश वानकर यांच्या विरोधात होईल.
वानकर यांचा प्रभाव देगाव भागात मोठा आहे. तर देगाव नाका, हब्बू वस्ती, दमाणी नगर या भागात मनोज शेजवाळ यांचे प्राबल्य दिसून येते. शेजवाळ यांनी अद्यापही याबाबत कोणताही निर्णय घेतलेला दिसत नाही. यासोबत माजी नगरसेवक सुनील खटके हेसुद्धा यावेळी निवडणूक लढवतील. पूर्वी त्यांच्या पत्नी वानकर, शेजवाल यांच्या पॅनल मध्ये नगरसेविका होत्या. या प्रभागात एक आरक्षण ओबीसी सर्वसाधारण झाले आहे. खटके हे भाजपमध्ये आहेत त्यामुळे खटके कुणाच्या पॅनल मध्ये जाणार याची सुद्धा उत्सुकता असेल.
दुसरीकडे वानकर हे सुद्धा भविष्यात आपला राजकीय निर्णय बदलणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून तशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे.



















