महेश कोठे : आमची कोणती कंडीशन नाही, आम्हाला आमची कमांड दाखवायचीय ; सुधीर खरटमल : प्रणिती शिंदे यांचा हात आमच्या……
सोलापूर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापुरात लोकसभा निवडणूक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची पूर्व तयारी बैठक आयोजित करण्यात आली होती. शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर महेश कोठे, यू एन बेरीया, निरीक्षक शेखर माने, जनार्दन कारमपुरी, नलिनी चंदेले, शंकर पाटील, प्रशांत बाबर, सुनीता रोटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महेश कोठे म्हणाले, काँग्रेसचे काही कार्यकर्ते अति कॉन्फिडन्स मध्ये असल्याचे पाहायला मिळते परंतु गाफील राहून चालणार नाही. आणखी महिनाभर असल्याने वातावरण कधीही बदलू शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांनी सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकपणे आम्ही काम करणार आहे. आमची काँग्रेस समोर कोणतीही कंडिशन नाही, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कमांड सोलापुरात किती आहे हे आम्हाला या निवडणुकीतून दाखवायचे असल्याने आम्ही संपूर्ण ताकद लावून आमदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
शहराध्यक्ष सुधीर खरटमल म्हणाले, आम्ही काँग्रेसच्या बोलावण्याची वाट पाहणार नाही. महाविकास आघाडी मधील आमचा पक्ष असल्याने आम्ही ऑलरेडी प्रचार सुरू केला आहे. यापुढे प्रत्येक भागात पदयात्रा, कॉर्नर बैठका आमच्या स्वतंत्रपणे होणार आहेत. कुठे काही चुकले तर ज्येष्ठ नेत्यांनी नक्की सांगावे. आम्हाला आमदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करावा लागत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी जुन्या विषयांवरून नाराजी व्यक्त केली पण आघाडीचा धर्म पाळणार, प्रणिती शिंदेंना निवडून आणणार असे म्हणून त्यांनी मागील डिजिटल बोर्डावर आमदार प्रणिती शिंदे यांचा हात आहे का याची तपासणी केली.
नलिनी चंदेले म्हणाल्या, काँग्रेस प्रमाणेच राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सन्मान व्हायला पाहिजे, महापालिका निवडणुकीत विरोधात उमेदवार उभे करू नये, जोमाने काम करू या, प्रणिती शिंदे यांना निवडून आणूया.