महादेव कोगनूरे यांचे मुलाला आतापासूनच सामाजिक कार्याचे धडे ; चिरंजीव लक्ष्मीकांतचा वाढदिवस अनाथांसोबत साजरा
वाढदिवस म्हटले की, फुगे व हारतुरे यांची सजावट दिसून येते. मात्र, या सर्वांना फाटा देत एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी चिरंजीव लक्ष्मीकांत याचा वाढदिवस कंदलगाव येथील मोहिनी वाॅटर पार्क येथे संस्कार संजीवनी आश्रम(हगलूर) व प्रार्थना फाऊंडेशन (मोरवंची) यांच्यासह शहरातील विविध अनाथ आश्रमातील मुलांसोबत साध्या पद्धतीने साजरा केला. आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे व आपल्याला समाजाचे काही देणे आहे, या उदात्त भावनेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
चिरंजीव लक्ष्मीकांत याच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलांनी मोहिनी वाॅटर पार्क मधे मनमुराद विविध खेळांचा,रेन वाॅटर चा आनंद घेतला. यावेळी मुलांना स्नेहभोजन देऊन त्याच ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा केला. तसेच संपूर्ण दिवस या मुलांसोबत मौज, मजा केली. येथील चिमुकल्यांचा किलबिलाट आणि प्रत्येकाच्या चेह-यावर एक प्रकारचा आनंद पहायला मिळाला.
वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून अनाथ मुलांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे व आपले कर्तव्य आहे या समाजासाठी काहीतरी करणं व आपल्या आनंदात अनाथ मुलांना सामावुन घेणं व त्यांची मदतरुपी सेवा करुन त्याचं दुःख कमी करणं म्हणुन अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत असल्याचे एम के फाऊंडेशन चे संस्थापक-अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी सांगितले.
प्रार्थना फाऊंडेशन चे संचालक प्रसाद मोहिते म्हणाले, मी गेली अनेक वर्षे अनाथांचा सांभाळ करताना महादेव कोगनुरें सारखे काही मोजकेच इथे येऊन भोजनसेवा देत असतात. कारण हा उपक्रम तुमचा माझा सर्वांचा आहे, येथील मुलामुलींचे संगोपन करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम कोणीतरी येऊन करत असतो.
याप्रसंगी मंद्रूप मठाचे निरंजन देवरू महाराज यांच्यासह फाउंडेशनचे सर्व संचालक पदाधिकारी, कोगनुरे परिवारातील सर्व सदस्य, मिञ मंडळी उपस्थित होते.