लिंगायत मत विभाजनाचा फायदा युवराज राठोड यांना होणार ! पाच वर्षे रोजंदारी म्हणून काम करेल
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांनी शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील
होटगी, आहेरवाडी, होटगी स्टेशन, हिपळे, उत्तर तालुक्यातील तिऱ्हे, पाकणी, हिरज, बेलाटी, समशेदपूर, तेलगाव, डोणगाव या गावात झंझावाती प्रचार दौरा केला प्रचंड पाठिंबा त्यांना पाहायला मिळाला.
दक्षिण मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर युवराज राठोड यांनी आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला. त्यामुळे मराठा समाजाने सुद्धा त्यांना पाठीशी राहण्याची ग्वाही दिली आहे.
यावेळी जनतेशी संवाद साधताना युवराज राठोड यांनी आता विद्यमान आमदारांना घरी बसवण्याची वेळ आली आहे. त्यांची रिटायरमेंटची वेळ सुद्धा निघून गेली आहे. म्हणून माझ्या पाठीशी राहा, मी त्यांना घरी बसवतो असे सांगतानाच मला रोजंदारी म्हणून पाच वर्षे कामाला ठेवा, पहा मी तालुक्याचा विकास कसा करतो.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सध्या लिंगायत समाजातील सुमारे पाच ते सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात सर्वाधिक मतदार हे लिंगायत समाजाचे असल्याने या उमेदवारांमध्ये निश्चितच समाजाचे मत विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांना यापूर्वीच ओबीसी घटकातील सर्वच समाजाने पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्यांच्या बंजारा समाजाने तर एक मुखी पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे लिंगायत मत विभाजनाचा फायदा आपणालाच होईल आणि आपण या निवडणुकीत विजय होऊ असा दावा राठोड यांनी केला आहे.