सोलापूर : राजमाता चांदबीबी सुलतान सोशल ट्रस्ट सोलापूर यांच्या वतीने रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे सिने अभिनेते व नटसम्राट दिलीपकुमार जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोशल अवार्ड २०२३ वितरण व सुरिली शाम गीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक मंजुषा गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी लतामंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, महेंद्र कपुर यांच्या गीतांची सुरीली शाम मुंबई येथील अकबर सोलापूरी यांचे ऑर्केस्ट्रासहीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेलेब्रेटी कलाकारांचे गीत व संगीतचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बॉलिवूडचे निर्माता-निर्देशक व लेखक डॉ. पृथ्वीराज सुरेश ओबेरॉय हे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
● हे आहेत पुरस्काराचे मानकरी
प्रिसीजनचे यतीन शहा (उद्योजक क्षेत्र), अॅड. धनंजय माने (विधी क्षेत्र), डॉ. विजय कानेटकर (वैद्यकीय क्षेत्र), केतन व्होरा (सामाजिक ), कफिल मौलवी (रिअल इस्टेट क्षेत्र), शुभांगी बुवा (सामाजिक ), एजाज हुसेन मुजावर (पत्रकारीता ), यु.एफ.जानराव (कुष्ठरुग्ण सेवक) यांना सोशल अॅवार्ड २०२३ देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पत्रकार परिषदेस माजी महापौर आरीफ शेख, राजमाता चाँदबीबी सुलतान सोशल ट्रस्टचे अध्यक्ष रूस्तुम् कंपली, शकील मौलवी, अनंत जोशी आदी उपस्थित होते.