करमाळा, माळशिरस व दक्षिण सोलापूरचे निरीक्षक बदलणार ; काँग्रेसने घेतला निर्णय
सोलापूर -पुणे येथील काँग्रेस भवनात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे सह प्रभारी सोनलबेन पटेल यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठक संपन्न झाली.
या बैठकीस संबोधित करताना पटेल यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा, सोलापूर, बार्शी या तीन लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय माहिती घेऊन काँग्रेस पक्षाचे संघटना मजबूत करण्यासाठी बुथ मंडल सक्षम करा अशी आवाहन केले. काँग्रेस पक्षाच्या बैठकीस गैरहजर राहणे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कडून वेळोवेळी आलेले आदेश पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. यापुढे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी दिली जाणार असल्याची सुचित केले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील १६ ब्लॉक,
५ शहरांची बुथ वाईज माहिती जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी दिली. लवकरच सोलापुरातील सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची हत्तुरे यांनी माहिती दिली.
या प्रसंगी माजी आमदार धनाजी साठे, वरिष्ठ उपाध्यक्ष भिमाशंकर जमादार, अशपाक बळोरगी, माढयाचे नगराअध्यक्षा मिनल साठे, जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार, दादा साठे, राजकुमार पाटील, मुन्ना हरणमारे, जिल्हा संघटक रमेश हसापुरे, भारत जाधव, पंढरपूर तालुका अध्यक्ष हणमंत मोरे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष शालीवान माने, सांगोला तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे, पंढरपूर शहर अध्यक्ष अमर सुर्यवंशी, अक्कलकोटचे हडलगी, निराधारसेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश हावळे, श्रीशैल रणखांबे, अमोल म्हमाणे, मोहोळ अध्यक्ष किशोर पवार, काकासाहेब बंडगर, सौदागर जाधव आदी उपस्थित होते.