जांबमुनी मोची समाज ज्यांच्या पाठीशी राहतो त्यांचा विजय निश्चित ; देवेंद्र कोठे 40 हजाराने विजयी होणार ; बाबा करगुळे
सोलापूर 249 शहर मध्य विधानसभेचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ श्री आदि जांबमुनी मोची समाजाचा भाजप प्रेमीचा मेळावा सात रस्ता अब्दुलकर मंगल कार्यालय मध्ये घेण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे होते.
यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, मोची समाजावर काँग्रेस पक्षाकडून जो अन्याय झाला ते अन्याय भाजप पक्षात होणार नाही. आम्ही सत्ता स्थापन केल्यानंतर आम्ही पहिले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू, जांबमुनी मोची समाजाचे शाळेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तो आम्ही मार्गी लावू. जांबमुनी मोची समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार सोलापूर महानगरपालिकेत असतील असे ही म्हणाले.
यावेळी अंबादास बाबा करगुळे यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी काँग्रेस सोडण्यामागील आपली भूमिका स्पष्ट करताना जांबमुनी मोची समाज ज्यांच्या पाठीशी उभा राहतो त्याचा विजय निश्चित असतो असे सांगताना भाजप उमेदवार देवेंद्र कोठे हे चाळीस हजाराच्या फरकाने मध्य मतदार संघातून विजयी होणार असा दावा केला.
काँग्रेस पक्षाचे गळती सुरूच माजी नगरसेवक अनिल पल्ली, माजी नगरसेविका संजीवनी कुलकर्णी, मोची समाज युवक संघटना माजी अध्यक्ष यलप्पा तुपदोळकर, मल्लु (बाबा)म्हेत्रे, लोधी समाजाचे युवक यांचा भाजप पक्षात प्रवेश झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांनी केले.
यावेळी या कार्यक्रमास भाजप पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र काळे, भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते शहाजी पवार, जेष्ठ नेते किशोर देशपांडे, रोहिणी तडवळकर, भाजपा मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष मारेप्पा कंपल्ली, लष्कर विभागीय अध्यक्ष करेप्पा ज॔गम, माजी स्थायी समिती अध्यक्ष सिद्राम अट्टेलुर, माजी नगरसेवक जेम्स जंगम, नगरसेविका वैष्णवी करगुळे, सरस्वती कासलोलकर, मीनाक्षी कंपल्ली, रेणुका गोडलोलु, माजी अध्यक्ष बाबुराव संगेपाग, उपाध्यक्ष नागनाथ कासोलकर, कुमार जंगडेकर, मोची समाज युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे, रथोत्सव अध्यक्ष रवि आसादे, अंनत गोडलोलु, भिमा आसादे, राजु अलकोड, शाम म्हेत्रे, तायप्पा म्हेत्रे, राजु आसादे, सुनिल म्हेत्रे, प्रशांत करगुळे, तम्मा विटे, विनायक ढाले, अंबादास नाटेकर आदि मान्यवर उपस्थितीत होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. योगेश पलोलु यांनी केले.