




सोलापूर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिनी शासकीय ध्वजारोहण उत्साहात
सोलापूर जिल्हा परिषदेत देशाचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ध्वजारोहण करणेत आले. प्रारंभी सिईओ जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
ध्वजारोहणा नंतर सिईओ जंगम यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना भेटून स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मुख्यालयात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणेत आला.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मीता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, मुख्य लेखा अधिकारी मिनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, सुलभा वटारे, समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, जलसंधारण कार्यकारी अभियंता यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.