महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी तयार रहा ; भाजप कार्यालयात जयभाऊनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद
७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर कार्यालय येथे आयोजित केलेल्या झेंडावंदन सोहळा पार पडल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चहा पाणी घेत संवाद साधला.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा असून,आपल्या शहराध्यक्ष या अत्यंत धाडसी व शिस्तीच्या असून त्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे आपल्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर असल्याचे सांगत भाजप कार्यालयात माझ्या दौऱ्यात एक तास संघटनेसाठी देणार असल्याचे सांगितले व येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा कमळ महापालिकेवर फुलवायचे प्रतिपादन केले.
सदर प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे,शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर भारतीय जनता पार्टीचे सर्व शहर पदाधिकारी पदाधिकारी,मंडल अध्यक्ष,मोर्चा आघाडी प्रकोष्ठ अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..





















