आमदार देवेंद्र कोठेंचे प्रयत्न अन् आनंद चंदनशिवे यांचा पाठपुरावा ; संविधान भवनाचा मार्ग मोकळा
सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्क चौकातील पुतळ्या मागील (एक एकर जागेवर) संविधान भवन यांचा मार्ग मोकळा झाला आहे. सदरच्या संविधान भवन निर्मितीसाठी ही जागा शासनाने घातलेल्या नियम अटी शिथिल करण्यात आमदार देवेंद्र कोठे यांनी पुढाकार घेतला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे संविधान भवनासाठी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानातील एक एकर जागा देण्याची मागणी केली होती. भरणे यांच्यामुळे जागा मिळाली पण बऱ्याच NOC बाकी होत्या.
आता या विषयात सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी लक्ष घालून पाठपुरावा केला.त्याला यश आले आहे. याबद्दल आमदार कोठे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं सर्व सोलापूर शहरातील सर्व समाज बांधव व भीमसैनिकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करत असल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी काढले आहे.






















