सोलापुरात प्रथमेश कोठेंमुळे भाजप स्ट्राँग ; देवेंद्रदादांचे वजन वाढले !
सोलापूर : शुक्रवारी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. अनपेक्षित आणि मोठे यश भाजप एनडीए सरकारने मिळवले. सोलापुरात एकीकडे भाजप तर्फे या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा झाला तर दुसरीकडे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या युवा नेता प्रथमेश कोठे यांचे सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आले. स्वागत ही असे झाले की, संपूर्ण सोलापूर बघत राहिले. यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाची ताकद सोलापुरात वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या नंतर काही महिन्याने माजी महापौर महेश कोठे यांचे निधन झाले. अण्णांचे वारस प्रथमेश कोठे आता काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अण्णा हे शरद पवारांच्या राष्ट्रवादित होते पण एकूणच विधानसभेचा निकाल आणि सोलापूर शहर उत्तर विधानसभा निवडणुकीत तयार झालेले वातावरण पाहता प्रथमेश हे निश्चित दुसऱ्या पक्षात जातील अशी चर्चा होती. ते भाजप नको म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुद्धा प्रवेश करतील अशा चर्चा सुरू होत्या. पण आपले चुलत बंधू देवेंद्र कोठे हे भाजपचे आमदार असल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी भूमिका अनेकांची होती. पण त्याच भाजपमुळे अण्णा पडले असेही काही बोलत होते. पालकमंत्री जयकुमार गोरे हे सुद्धा बऱ्याच वेळा प्रथमेश यांना भेटले होते.अखेर प्रथमेश यांनी देवेंद्र कोठे यांना सोबत घेऊन भाजपात प्रवेश केला.
विडी घरकुल परिसरात महेश कोठे यांची ताकद आहे. किमान बारा नगरसेवक त्यांचे निवडून येतात. त्यामुळे भाजप आणखी प्लस झाली आहे. प्रथमेश कोठे यांच्यामुळे आमदार देवेंद्र कुटे यांचेही वजन भाजपमध्ये वाढल्याचे दिसून येते. यामुळे आता मी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप अधिकच मजबूत झाली असून महानगरपालिकेत पुन्हा एक हाती सत्ता भाजपची येईल अशी चर्चा आता सुरू झाली आहे.




















