सोलापूरच्या राजकीय वर्तुळात या भेटींनी वेधले लक्ष ; कुठे गुलाबी शुभेच्छा तर कुठे प्रवेशाची चर्चा
सोलापूर : अगं मी महानगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून तरी कुठल्या राजकीय हालचाली दिसत नसल्या तरी राजकीय नेत्यांच्या भेटींची चर्चा मात्र जोरदार होऊ लागली आहे.
मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर गावामध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ कुणालाही अपेक्षित नव्हता असा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाला त्यावेळी मोहोळच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांना निमंत्रित करून आपल्या अंतर्गत विरोधकाला टार्गेट केले. माजी आमदार राजन पाटील आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा तो कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
मोहोळ तालुका अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने राजन पाटील यांनी पक्षाचा आदेश मानून तीन टर्म आमदार निवडून आणला त्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांचा क्लेम बसतो पण आता बदललेले राजकीय समीकरणे पाहता राजन मालकांना वेटिंग वरच राहावे लागते का असे बोलले जात आहे. त्यामुळे राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा कायमच ऐकण्यास मिळते. अशातच सचिन कल्याणशेट्टी हे मोहोळच्या कार्यक्रमाला आल्याने मालकांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणखीच जोराने ऐकण्यास मिळत आहे.
दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या सोलापूर शहरातील संपर्क कार्यालयाला भेट देऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार केला. हा सत्कार केवळ बुके देऊन नव्हता तर राष्ट्रवादी काँग्रेसचा सध्या चर्चेत असलेला गुलाबी कलर तो कलर या बुकेमध्ये सामावलेला पाहायला मिळाला. त्यामुळे संतोष पवार यांचा वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झाल्याचे दिसून आले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर विजय मालक संतोष भाऊंच्या कार्यालयात गेल्याने ती सुद्धा चर्चा आता नव्याने सुरू झाली असून भाऊंचे राजकारणातील महत्व पाहायला मिळत आहे.