सोलापुरात दादांच्या राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन ; थेट भाजपला दिले हे चॅलेंज
सोलापूर / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच राष्ट्रवादी { शरद पवार गटाचे } माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, काँग्रेस मधून आलेले जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा, शिवसेना { उबाठा} गटाचे माजी उप महापौर विष्णू निकंबे, माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या निमित्त जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात दायमा, खरटमल, निकंबे यांचा शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान , प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, तौफिक शेख यांच्या उपस्थितीत सोमवारी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर व्यासपीठावर अल्पसंख्याक विभाग महामंडळाचे राज्य सदस्य वसीम बुऱ्हाण, मकबूल मोहोळकर ,जेष्ठ नेते हेमंत चौधरी ,
माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे ,फारूक मटके, शशिकांत कांबळे, बसवराज बगले, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, तस्लिम शेख, बहिदा शेख, युवक अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जक्का, महेश कुलकर्णी, चेतन गायकवाड, खलील शेख , जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे, युवराज चुंबळकर, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादिराजे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, प्रियंका पवार , निशांत तारानाईक, माजी नगरसेवक नारायण माशाळकर, बसवराज कोळी, रुपेशकुमार भोसले , सरोजनी गायकवाड ,श्यामराव गांगर्डे , वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, सचिन चलवादी, धनंजय जाधव , सत्येनं जाधव , अनिकेत पवार , गिरीश पवार , यांच्यासह सर्वच फ्रंटल सेलचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते , मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनेकांचा पक्ष प्रवेश या कार्यक्रमात करण्यात आला.
यावेळी संतोष पवार, जुबेर बागवान, चंद्रकांत दायमा, सुधीर खरटमल, किसन जाधव ,आनंद चंदनशिवे यांनी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपकी बार ५० पार ची घोषणा केली. सद्यस्थितीत राज्यात महायुती सरकार वेगवान पद्धतीने काम करत असून पुढील येणाऱ्या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी , शिवसेना { शिंदे गट } च्या पक्ष प्रमुखांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, सुधीर खरटमल , किसन जाधव , आनंद चंदनशिवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
शहर – जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षातील नेते , कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असून या पक्ष प्रवेशामुळे शहर – जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चांगलीच ताकद वाढली आहे.त्यामुळे येणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच पदाधिकारी – कार्यकर्ते प्रचंड बहुमताने मताने विजयी होतील असा विश्वास शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केला आहे.



















